Akurdi : आकुर्डी गावचे सामाजिक कार्यकर्ते हभप ज्ञानेश्वर काळभोर यांचे निधन
एमपीसी न्यूज – आकुर्डी गावचे सामाजिक कार्यकर्ते हभप ज्ञानेश्वर नारायण काळभोर यांचे ह्दयविकाराच्या आजाराने दु:खद निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.
ज्ञानेश्वर काळभोर यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी (दि. 8 मे) निगडी येथे होणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून फक्त कुटुंबा पुरता मर्यादित दशक्रिया विधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे.