Pune : महापालिकेच्या विकासकामांत पोलिसांच्या एनओसीचा अडथळा नको – महापौरांचे आदेश

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या विकासकामांत पोलिसांच्या एनओसीचा अडथळा नको, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. सोमवारी सर्वसाधारण सभेत आयोजित महापालिका आयुक्त सौरभ राव यांना या आदेशाची अंमलबजावणी करीत परिपत्रक काढण्यासही सांगण्यात आले.  प्रभागांत विकासकामे करताना नगरसेवकांना अनेक अडचणी येतात. 4 – 6 महिने पोलीस एनओसी देत नाहीत. ठेकेदारांना त्रास देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे ताबडतोब याची दखल घेऊन महापालिकेच्या कामात कोणताही अडथळा नको. एनओसी मागतो म्हणजे आपण परवानगी घेत नाही. आपण केवळ महितीस्तोव सादर करतो. त्याची पोलीस आयुक्तांना माहिती द्यावी, असेही मोहोळ यांनी आयुक्तांना सांगितले.

सुरुवातीला काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. वाहतुकीला काही अडचण नसतानाही एनओसी मिळत नाही. 4 – 6 महिने उशीर लागत असल्याचे शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले. माझ्याच प्रभागात ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला आहे. अंतर्गत रस्ता असतानाही लगेच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले.

पाण्याची पाईपलाईन टाकत असताना पोलीस खाते त्रास देते. काम सुरू झाल्यावर त्रास देऊ नये. आता पोलिसांमुळे 10 ते 15 दिवसही उशीर होऊ नये. पोलिसांना समजून सांगा. वाहतूक सुरळीत करण्याऐवजी भलतेच काम पोलीस करतात. आमदार – खासदारावर कारवाई करता तर पोलीसंवरही कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली. येरवडा पूल धोकादायक असून, एनओसी मिळत नसल्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले. नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, महेंद्र पठारे, गफूरभाई पठाण यांनीही आपली मते मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.