Technology News : ‘या’ वेळेत नका वापरू UPI पेमेंट्स ॲप्स

एमपीसी न्यूज : ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सद्ध्या विविध ॲप्सचा वापर केला जात आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम, आदी ॲप्स नागरिक आर्थिक व्यवहारांसाठी वापरत आहेत .परंतु रात्री 1 ते 3 च्या दरम्यान जर तुम्ही आर्थिक व्यवहार करत असाल, तर तुम्हाला काही दिवस समस्या येऊ शकते, असे एनपीसीआयने ट्विटरद्वारे सांगितले आहे.

ग्राहकांना काही दिवस रात्री 1 ते 3 च्या दरम्यान पेमेंट करताना समस्या येऊ शकते. त्यामुळे वापरकर्त्यांनी या वेळेत पेमेंट करणे टाळावे. त्यामुळे ही वेळ वगळून दुस-या वेळेची पेमेंट करण्यासाठी निवड करावी, असे आवाहन नॅशन पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

युपीआय व्यवहारांना चालना देण्यासाठी, काही नवे बदल युपीआय माध्यमांमध्ये करण्यात येणार आहेत. त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी ही वेळ नागरिकांनी टाळावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.