Pimpri : ‘मुक्तांगण-२०१८’ला डॉक्टरांचा प्रतिसाद 

एमपीसी न्यूज – इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज यांच्या वतीने डॉक्टरांसाठी आयोजित केलेल्या ‘मुक्तांगण २०१८’ या दोन दिवसांच्या पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील साहित्य-कला संमेलनाला २५० हून अधिक डॉक्टरांनी प्रतिसाद दिला. 

डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, खजिनदार डॉ. यशराज पाटील, संचालिका स्मिता जाधव, कुलगुरु डॉ. पी. एन. राझदान, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, खासदार शांतनु सेन, आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे आदी उपस्थित होते.

डॉक्टरांचे मन जात्याच सृजनशील असते. पण कार्यबाहुल्यामुळे त्यातल्या कित्येक गोष्टी मनात असल्या तरी ते प्रत्यक्षात आणणे शक्य होत नाही. या सुप्त गुणांना योग्य संधी मिमळाली तर या संधीचे ते सोने करू शकतात याची प्रचिती आली. निमित्त होते मुक्तांगण या डॉक्टरांनी डॉक्टरांसाठी राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच घेतलेल्या साहित्य-कला संमेलनाचे.

काही दिवसांपूर्वी ससूनमध्ये यकृत रोपणाच्या शस्त्रकि‘येत महत्वाची भूमिका करणार्‍या डॉ. कमलेश बोकील यांचे गिटार वादन, बालरोगतज्ज्ञ आणि सर्जन डॉ. डसमित सिंग यांचे वादन, रेडिओलॉजिस्ट डॉ. सुप्रिया गाडेकर व डॉ. नंदन यार्डी यांचा ऑर्केस्ट्रामधील सहभाग, भूलतज्ज्ञ डॉ. सतीश ङ्गडके यांचे छायाचित्र व पेंटिंग प्रदर्शन, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. आरती निमकर, गिरीजा वाघ व नेत्रतज्ज्ञ डॉ. राधिका परांजपे यांचे शास्त्रीय नृत्य, नेत्रतज्ज्ञ डॉ. संजय पाटील आणि जनरल सर्जन डॉ. पद्मा अय्यर यांचे बॉलिवूड नृत्य, डॉ. सरोज पांडे यांचे शास्त्रीय गायन आणि पॅथॉलॉजिस्ट डॉ. मंदार परांजपे यांनी सादर केलेली मी लॅब टाकली ही एकांकिका वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

काव्यांजली या कवी संमेलनात युवा डॉक्टरांचा सहभाग मोठा होता. डॉक्टरांवरील वाढते हल्ले, त्यावरील उपाययोजना, प्रेम, विडंबन जनजागृती या विषयांवरील कविता सादर करण्यात आल्या. डॉक्टरांनी लिहिलेल्या विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. संमेलनापूर्वी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीचे भान राखून लोकजागरणासाठी हात घातलेल्या चित्रपटांचे अवलोकन करण्यात आले. चित्रपट दिग्दर्शक डॉ. मोहन आगाशे यांची चित्रपट कसे बनवावेत या विषयावरील कार्यशाळा झाली. डॉक्टरांनी समाजाभिमुख होण्यासाठी संभाषण कलेची आवश्यकता असते, असे मत डॉ. आगाशे यांनी यावेळी व्यक्त केले. ङ्गॅमिली डॉक्टरही संकल्पना लोप पावत आहे. सुपर स्पेशॉलिटीमुळे संवाद कमी झाला आहे, असे मतही डॉ. आगाशे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.