Pune: कोरोनाच्या काळात घेतलेल्या डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफला अद्यापही वेतन नाही : दीपाली धुमाळ 

Doctors, nurses and other staff hired during Corona pandemic are still unpaid: Deepali Dhumal

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात घेतलेल्या डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफला अद्यापही वेतन देण्यात आले  नाही, अशी माहिती विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी सोमवारी दिली. 

पुणे शहरात कोरोगाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी कोविड सेंटर, विलगीकरण कक्ष, मनपा ओपीडी, मनपा रुग्णालये याठिकाणी स्टाफ नसल्याने नागरिकांवर उपचार करणेबाबत अडचणी होत्या.

सबब पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ४५ दिवस व 6 महिने अशा कालावधीसाठी डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ कामासाठी रुजू करून घेतले होते. कोरोनाच्या काळात देखील डॉक्टर्स नर्स व इतर स्टाफ यांनी 45 दिवस व 6 महिने इतका कमी कालावधी असतानाही मनपा सेवेत रुजू झाले आहेत.

असे असताना २ महिने झाले तरी अदयापही त्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. याबाबत काही डॉक्टर्स व इतर स्टाफ यांच्या आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.

45 दिवसाकरिता ६ महिने कालावधीसाठी डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफ कामासाठी आले असता त्यांचे वेतन वेळेवर अदा का होत नाही याची खातरजमा करणे आवश्यक होते.

पुणे महानगरपालिकेचे बहुतांशी अधिकारी कोरोनाच्या सेवेत असतानाही वेतन करणेसाठी नियमित प्रक्रिया होत नाही ही खेदजनक बाब आहे, अशी स्पष्ट नाराजी दीपाली धुमाळ यांनी आज आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

त्यामुळे ४५ दिवसा करिता व 6 महिने अशा कालावधीसाठी डॉक्टर्स, नर्स इतर स्टाफ यांचे वेतन अदा करण्यासची कार्यवाही अति तातडीने करावी, वेळेत वेतन न करणारे संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांना योग्य समज देवून कायदेशीर कारवाई करावी, केलेल्या  कार्यवाहीची माहिती कळवावी, असेही पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.