Pune: कोरोना रूग्णांवर उपचार करणार्या जहांगीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा डॉक्टर्स दिनानिमित्त सन्मान 

Doctors of Jahangir Hospital treating Corona patients were honored today on the occasion of Doctor's day.

एमपीसी न्यूज – पुणे स्थित राउंड टेबल इंडिया (पीएसआरटी-177) ने आज (दि.1) जहांगीर रुग्णालयात ‘राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्ताने  डॉक्टरांचा सन्मान केला, यावेळी कोरोना रूग्णांवर प्रत्यक्ष उपचार करणार्‍या 50 हून अधिक डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ललित पिट्टी, राहुल वाधवा आणि राऊंड टेबल इंडिया (आरटीआय- पीएसआरटी- 177 ) चे विद्यमान अध्यक्ष  रिषु बावेजा उपस्थित होते. या सोहळ्यास आरटीआयच्या इतर मान्यवरा समवेत एरिया चेयरमन देवेश जटिया उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व जहांगीर रूग्णालयाचे अध्यक्ष जहांगीर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ केला.

रिषु बावेजा यांनी जहांगीर यांचा सत्कार केला आणि डॉक्टरांना प्रमाणपत्रे दिली. महामारी विरूद्ध लढ्यात आणि रुग्णांच्या उपचारासाठी मेहनत घेणार्या डॉक्टरांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.