Chinchwad : श्री मोरया गोसावींवर माहितीपट

एमपीसी न्यूज – चिंचवङ देवस्थान ट्रस्ट तर्फे श्री मोरया गोसावी यांचा माहितीपटाचा शुभारंभ नुकताच झाला. या माहितीपटामध्ये सिध्देटक, थेऊर, चिंचवड. श्री सिध्दीविनायक, श्री चिंतामणी, श्री मंगलमूर्ती वश्री मोरया यांचा माहितीपट 25 मिनीटांचा प्रत्येकी दाखविण्यात आला आहे. हा माहितीपट मोफत दाखविण्याची सोय संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर करण्यात आली आहे.

पुणे शहराचे उपनगर असणार्‍या चिंचवड गावात पवना नदीकाठी असलेल्या मोरया गोसावी गणपतीची मोठी महती आहे. या माहितीपटामध्ये त्या स्थानाच्या धार्मिक माहितीबरोबरच, ग्रंथामधील संदर्भ, एेतिहासिक माहिती, देऊळच्या बांधकामाची माहिती, दैनंदिन व विशेष पूजाअर्चा यांच्या माहितीबरोबरच इतरही उपयुक्त माहितीसाचा समावेश आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विश्राम देव यांनी दिली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.