Pune News : क्रूरता ! भटक्या कुत्र्याच्या अंगावर कार घालून ठार मारले, महिलेविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुणे ः सोसायटीच्या प्रवेशद्वारावर बसलेल्या भटक्या कुत्र्याच्या अंगावर कार घालून त्याला ठार मारल्याप्रकरणी एका 35 वर्षीय महिलेविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

29 जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी नवाज कोम्बिज हखामनेषी (वय 56) यांनी फिर्याद दिली.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 29 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरोपी महिलेने सोसायटीच्या प्रवेशद्वारावर बसलेल्या स्पॉटी नावाच्या भटक्या कुत्र्याच्या अंगावर कार घातली. यात गंभीर जखमी झाल्याने संबंधित श्वानाचा मृत्यू झाला.

कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेविरोधात प्राण्यांना निर्दयतेने वागविणे प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.