Dog Rescue Pune : लोखंडी गेटमध्ये अडकलेल्या कुत्र्याची पुणे अग्निशमन दलाकडून सुटका

एमपीसी न्यूज – लोखंडी गेटमध्ये तोंड (Dog Rescue Pune) अडकलेल्या एका कुत्र्याची पुणे अग्निशमन दलाने आज (दि.17) सुखरूप सुटका केली आहे. ही घटना आज सकाळी पुण्यातील 384 भवानी पेठ येथे घडली.

नागरिकांनी याबाबत अग्निशमन दलाला फोन करून माहिती दिली. त्यानुसार अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कुत्र्याने बंद गेटमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात त्याचे तोंड लोखंडी गेटच्या जाळीत टाकले मात्र ते तेथेच अडकले. परिस्थितीची पाहणी करून जवानांनी बोल्ड कटरच्या सहाय्याने जाळी तोडून कुत्र्याला कोणतीही ईजा न करता त्याची सुखरूप सुटका केली. अवघ्या तासाभरात सुखरूप सुटका झाल्याने उपस्थितांनीही सुटकेचा श्वास सोडला.

Chakan : कुत्र्याचा पाय मोडला म्हणून चालकाला मारहाण

या कामगिरीत प्रभारी अधिकारी प्रशांत गायकर, वाहनचालक (Dog Rescue Pune) राजू शेलार व जवान मंगेश मिळवणे, कोकरे, गाडे, सोनावणे, जाधव, जकूने यांनी सहभाग घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.