Chinchwad : देश विदेशातील 40 जातीचे श्वान  पाहण्यासाठी श्वान प्रेमींची पिंपरी-चिंचवडमध्ये गर्दी (व्हिडीआे)

एमपीसी न्यूज – श्‍वान घरात असलं की, संरक्षणाची हमी वाटते. त्याला माणसं देखील ओळखता येतात. मालकाची सेवाही तो चोख बजावतो. श्‍वानांचे आणि मालकांचे विशेष नाते असते, श्‍वास विशेष प्रशिक्षित असतात. हे सर्व काही पहायला मिळाले चिंचवडमध्ये आयोजित डॉग शोमध्ये. श्‍वानप्रेमी मोठ्या हिरीरीने डॉग शोमध्ये सहभागी झाले होते. देशभरातून आलेल्या श्‍वानप्रेमींनी डॉग चॅम्पिअनशिपसाठी कसरत केली. श्‍वानांची अनोखी दुनिया पाहून पिंपरी-चिंचवडकरही थक्क झाले.
वाल्हेकरवाडी  येथील आहेर गार्डन येथे रविवारी (दि.21) केनल क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने 112 व 113 वी चॅम्पियनशीप  डॉग शो आयोजित केला होता. या शोमध्ये शहरवासियांनी जवळपास 40 प्रजातीचे श्वान जवळून पहावयास मिळाले. भारतीय श्‍वानाबरोबर परदेशी प्रजातीचे श्वान देखील यात सहभागी झाले होते. पिपंरी-चिंचवडमधील हा तिसरा डॉग शो होता. सर्वजण वेगवेगळे श्‍वान पाहण्यात दंग झाले होते. बालचमू तर श्‍वानांना पाहून खुश झाले.
डॉग शोमध्ये जवळपास 300 डॉग सहभागी झाले होते. पाच महिन्यांपासून ते 10 वर्षापर्यंतच्या श्‍वानांचा यामध्ये समावेश होता. राज्यस्तरातून श्‍वानप्रेमींनी श्‍वानासोबत प्रदर्शनास हजेरी लावली होती. यामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमन, ग्रेट डेन, बीगल, पग, क्रॉकर्स स्पॅनिएल, बुल मास्टिफ, लासा, रॉटविलर, डालमिशन तसेच विशेष आकर्षण म्हणुन अफगाण हाउंड, जायंट श्नाउजर, फॉक्स टेरियर, साइबेरियन हस्की या जातीचे श्वान पहावयास मिळाले.

काही घरगुती श्‍वान पाळणाऱ्या श्‍वानप्रेमींनी देखील मोठ्या हौसेने आपल्या श्‍वानाला सजवून या शोमध्ये आणले होते. जवळपास 100 किलो वजन असलेले श्‍वान देखील या स्पर्धेत सहभागी होते. खासकरून महाराष्ट्रात आढळून न येणाऱ्या जातींना पाहण्यासाठी जास्त गर्दी जमली होती. यामधील काही श्‍वान हे चीन, थायलंड, सिंगापूर, मलेशिया या देशातील होते. यावेळी श्‍वानाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या शोमध्ये बॉंम्ब शोधणे, रुमाल किंवा वस्तूच्या वासावरून माणसाला गर्दीत शोधणे, बॉडीगार्ड म्हणून काम करणे, चक्रातून उडी मारणे अशा कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. बर्फाळ प्रदेशात आढळणारा सायबर हशमी हा डॉग या शोचे विशेष आकर्षण ठरला.यावेळी  केनल कॉन्फिडरेशनचे अध्यक्ष संजय देसाई, सचिव एन. एस. पटवर्धन, संजीवनी पांडे, नंदकुमार जेठानी उपस्थित होते.
https://www.youtube.com/watch?v=4KZv465EdyI&feature=youtu.be
डोळ्याचे पारणे फेडणारे

रूबाबदार डोळे, करारीबाणा, झुपकेदार केस, लपलप करणारे शरीर, हाताएवढी जीभ आणि माणसाच्या खांद्यापेक्षाही वर झेप घेणारे श्‍वान डॉग शोमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये विविध जातीचे श्‍वान होते. जर्मन शेफर्ड, डॉबरमन, ग्रेट डेन, बीगल, पग, क्रॉकर्स स्पॅनिएल, बुल मास्टिफ, लासा, रॉटविलर, डालमिशन असे विविध प्रकारचे श्‍वान डॉग शोमध्ये लक्षवेधक ठरले. कार्यक्रमाचे सिद्धेश दर्शीले, तुकाराम सुर्वे, विकास बाराथे, संजय मुत्तुर, विक्रांत भोसले, राजेश जाधव यांनी केले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.