Dolasnath Patsanstha : बबनराव भेगडे यांचा सहकार भूषण पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज :  श्री डोळसनाथ नागरी सहकारी (Dolasnath Patsanstha) पतसंस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा तळेगाव दाभाडे येथे उत्साहात पार पडली. सहकार क्षेत्रात 45 वर्ष योगदान देत विविध पदे भूषविली याबद्दल बबनराव भेगडे यांचा सहकार भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढले. “संस्था स्थापन करणे सोपे असते, परंतु तिला यशस्वी रित्या चालविणे अतिशय खडतर आहे. कोविड काळात अनेक संस्था अडचणीत आल्या, परंतु या काळात देखील संस्थेने नफ्यात व यशस्वीपणे वाटचाल केली. यामधून असे निष्पन्न होते कि संस्थेचा सभासद कर्जदार हा ज्या विश्वासाने कर्ज घेतो, त्याच विश्वासाने तो परतफेड करतो असे आमदार शेळके म्हणाले.
सभेच्या अध्यक्ष स्थानी पुणे पीपल्स को ऑप बँकेचे अध्यक्ष सुभाष मोहिते व  प्रमुख व्यक्ते ज्येष्ठ लेखक पानिपतकर विश्वास पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे मावळचे आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माउली दाभाडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे, भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, ज्येष्ठ नेते अशोक बाफना, तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल शिंदे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे तसेच मावळ तालुक्यातील  सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित (Dolasnath Patsanstha) होते.
सभेमध्ये गेली 45 वर्षे सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदाना बद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते बबनराव भेगडे यांना मानपत्र, फुले पगडी व उपरणे देऊन ‘सहकार भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अगदी शुन्यातून सुरू केलेल्या प्रवासामध्ये सहा सहकारी संस्था श्री भेगडे यांनी स्थापन केल्या. तसेच 6 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष¸पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष नंतर अध्यक्ष म्हणून ही यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघावर बिनविरोध निवड¸ सातत्याने 3 वेळा पुणे जिल्हा सहकारी बोर्डावर संचालक पदी निवड¸तसेच सतत 3 वेळा पुणे पीपल्स बॅकेच्या संचालकपदी निवड.या अशी सहकारातील पदे त्यानी भूषवली.
देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त सीआरपीएफचे डी आई जी आय आय एम श्री धीरज कुमार याना विशेष पुरस्कार देण्यात आला .
याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे यांनी केले तसेच संस्थेबाबत माहिती देताना संस्थेचे तीन हजारापेक्षा जास्त सभासद असून संस्थेने या वर्षी 64 कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला. संस्थेने या वर्षी 25 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून संस्था दरवर्षी करीत असलेले विविध उपक्रम म्हणजेच महिलांकरिता अथर्व शीर्ष पठण¸दीपोत्सवाबाबत माहिती दिली तसेच प्रास्तविक संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल पारगे यांनी अत्याधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर करून तसेच चांगल्या प्रकारची ग्राहक सेवा या पुढे देण्याचा मानस आहे. संस्थेच्या सभेत सभासदांना 11% लाभांश जाहीर करण्यात आला. सभेचे सूत्र संचालन अतुल राऊत यांनी केले.तसेच संस्थेचे सर्व नवनिर्वाचित संचालक या वेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.