Pimpri : घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज –   नगरसेवक शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्या उमेदवारांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

यामध्ये गौरी व गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक फ्रीझ, दुसरे क्रमांकाचे बक्षीस मायक्रोवेव्ह तिसरे क्रमांकाचे बक्षीस इंडक्शन कुकर, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस व्हॅक्युम क्लिनर, पाचवे बक्षीस मिक्सर व इतर उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी रविवार दि. १ सप्टेंबर सायंकाळी ८ वाजेपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या संयोजनात प्रशांत शेट्टी प्रतिष्ठान, यशस्वी मित्र मंडळ, कर्तव्य फाउंडेशन, ठाकूरदास वाधवानी सोशल ट्रस्ट, श्रीधरनगर युवा प्रतिष्ठान, गणेशनगर मित्र मंडळ, भारत माता सत-संघ मंडळ यांचा सहभाग आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.