Don Dawood Ibrahim tests positive : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण

Infamous underworld don Dawood Ibrahim contracted corona

एमपीसी न्यूज – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेनंतर दाऊदचे सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत.

दाऊदची पत्नी महजबीनही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. दाऊदला आणि त्याच्या पत्नीला कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या कराचीमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मात्र, पाकिस्तानकडून वारंवार या गोष्टीला नकार दिला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही बातमी पूर्णपणे सत्य आहे आणि दाऊद आणि त्याच्या पत्नीला मिलिटरी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

‘CNN NEWS 18’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.