Donald Trump’s Twitter account suspension : ट्रम्प यांच्यावर ‘डिजीटल’ वार
एमपीसी न्यूज: अमेरिकेतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने व इंस्टाग्रामने (दि. 7) रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक खात्यावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ ट्विटरनेदेखील (दि. 8) रोजी ट्रम्प यांचे खाते कायमस्वरूपी ब्लॉक केले आहे. यानंतर अनेक संकेतस्थळांनी ट्रम्प व त्यांच्याशी संबधित असलेल्या संकेतसथळांना, ॲप्सना बॅन केले आहे.
ट्विटरने ट्रम्प यांचे समर्थक व सबंधित व्यक्ती यांची वैयक्तिक खाती ब्लॉक केली आहेत. ‘स्नॅप’ने देखील ट्रम्प यांना स्नॅप पोस्ट करण्यापासून बंदी घातली असून त्यांचे खाते लॉक केले आहे. स्नॅपवर ट्रम्प यांचे 2 दशलक्षांपर्यंत फॉलोवर्स आहेत.
फक्त समाजमाध्यमचं नव्हे तर ई-व्यापार करणाऱ्या संकेतस्थळांनीही ट्रम्प यांचा माल विकण्यास बंदी केली आहे. शॉपिफाय हे डिजीटली वस्तू, माल अशा दोन्हीचा पुरवठा करणारे डिजीटल माध्यम आहे. या माध्यमाने ट्रम्प यांच्या कॅंम्पेनचा व त्यांचा वैयक्तिक ब्रॅंडचा माल विकण्यास मनाई केली आहे. TrumpStore.com व shop.donaldjtrump.com या दोन संकेतस्थळांचा त्यात समावेश आहे. पे-पल या डिजीटली पैशांची देवघेव करणा-या संकेतस्थळ व ॲपने ट्रम्प यांच्या समर्थकांचे गट डीॲक्टीवेट केले आहेत.
अमेरिकेत संदेशांची देवघेव करणारे पार्लेर (Parler) ॲप गुगल प्ले स्टोअरवर पहिल्या क्रमांकावर आहे. गुगलने पार्लेर ॲप प्लेस्टोअरवरून काढून टाकले असून ॲपलने पार्लेरच्या डेवलपर्सना 24 तासांत योग्य ती कारवाई करण्याची सूचना केली होती. परंतु पार्लेरने तसे न केल्याने ॲपलने पार्लेरला बॅन केले आहे.
ॲमेझॉन वेब सर्विस, डिसकॉर्ड, ट्विच, युट्यूब, रेडीट, टिकटॉक अशी समाजमाध्यमेही ट्रम्प व त्यांच्या समर्थकांच्या खात्यांवर कडक बंधने, बॅन आणत आहेत. ट्रम्प यांचे टिकटॉकवर खाते नसल्याने कंपनी ट्रम्प यांच्या समर्थकांच्या खात्यांवर लक्ष ठेवून आहे.