Akurdi News : अन्नदानातून भाकरीचे आणि घामाचे नाते तयार होते : अजित अभ्यंकर

एमपीसी न्यूज – अन्नदानातून भाकरीचे आणि घामाचे नाते तयार होते. श्रमिकांच्या पोटात भुकेची आग आहे, ते हतबल आहेत, त्यांना आज अन्नाची गरज आहे, असे प्रतिपादन कामगार नेेते, कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ आणि फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने थरमॅक्स चौक आकुर्डी येथे सुरू केलेल्या अन्नदान कार्यक्रमात कॉम्रेड अजित अभ्यंकर, कॉम्रेड गणेश दराडे, कॉम्रेड अपर्णा दराडे यांनी अन्नदान केले.

अभ्यंकर पुढे म्हणाले की, “कोरोना काळात कष्टकरी वर्गाच्या भुकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील 45 कोटीहून जास्त लोक सरकारच्या रेशनिंगवर जगत आहे. मोठमोठ्या औद्योगिक शहरात नोकरी गेलेले, कामापासून वंचित झालेले लोक अच्छे दिन कधी येणार याची वाट पहात आहेत. ज्यांच्याकडे आधारकार्ड, रेशनकार्ड नाही असे लाखो लोक अन्नासाठी आसरा शोधत आहेत. अन्नदानातून भाकरीचे आणि घामाचे नाते तयार होते. श्रमिकांच्या पोटात भुकेची आग आहे,ते हतबल आहेत,त्याना आज अन्नाची गरज आहे. अशा गरजू लोकांना दररोज अन्नदान करून त्याच्या भुकेचा प्रश्न कष्टकरी महासंघाचे कार्य अनुकरणीय आहे.”

यावेळी राजेश माने, उमेश डोर्ले, संजय कांबळे, सीमा शिंदे, विजया पाटील हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.