Dehugaon : संत तुकाराम महाराज मंदिराला देणगी

एमपीसी न्यूज – देहूरोड येथील पै. बाळासाहेब फाले यांनी त्यांची नात श्रावणी हिचा पहिला वाढदिवस श्री क्षेत्र देहू येथील जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 11 हजार 88 रुपयांची देणगी तसेच मामुर्डी, थॉमस कॉलनी येथील माई बालभव या अनाथाश्रमातील मुलांना अन्नदान करुन साजरा केला. 

पै. फाले यांनी श्री देहू देवस्थानचे विश्वस्त हभप अशोक महाराज मोरे यांच्याकडे देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी गहुंजे गावे प्रगतशील शेतकरी राम बोडके, राहूल रायकर, कु. अवनी, निलेश मोरे, महादेव भारती,  गोविंद बर्गे,  रामकुमार अगरवाल आदी उपस्थित होते. तर, माई बालभवन येथे अन्नदान करताना मुकेश फाले, नकुल फाले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.