Pcmc Elecation 2022 : गाफील राहू नका, महापालिका निवडणुका कधीही जाहीर होतील – अजित पवार

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला सांगितले होते. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी प्रभाग रचना बदली आहे. पण, बदललेल्या या प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबत न्यायालयाला व्यवस्थित पटवून दिले आणि हा मुद्दा न्यायालयाला पटला. तर, महापालिकेची निवणूक केव्हाही लागेल. त्यामुळे गहाळ, गाफील राहू नका. निवडणुका कधीही जाहीर झाल्या तरी आपली तयारी असली पाहिजे, अशा सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कार्यकर्त्यांना दिल्या.

चिंचवड येथे राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या विजयाच्या पायाभरणीची सुरुवात करायची आहे.पक्षाची ध्येयधोरणे सर्वांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहचवावीत. आत्ता निवडणुकांचा ट्रेंड बदलला आहे. प्रत्येक प्रभागात सुक्ष्म पद्धतीने नियोजन करावे. बुथ कमिट्या सक्षम कराव्यात. प्रभागातील बलस्थाने आणि कमकुवत बाजू बघून काम करावे. बलस्थाने अधिक बळकट करा,कमकुवत बाजूमध्ये सुधारणा कराव्यात. उमेदवारी देतानाचा प्राधान्यक्रम माझ्या मनामध्ये मी ठरवले आहे. आघाडीबाबत स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोपविली जाईल. शहराला सर्वोत्तम शहर बनविण्याचा प्रयत्न करायचा आहे. राष्ट्रवादीची कामे हर घर पोहोचवायची आहेत.

महापालिकेत पाच वर्षे भाजपची सत्ता होती. त्यांचा कारभार सर्वांनी पाहिला आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये 2017 मध्ये चुकीचे राजकारण घडले. विरोधकांनी विकासकामांपेक्षा बदनामी करण्याचे सूत्र हाती घेतले. मात्र, मागील पाच वर्षात भाजपने करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडचा कायापालाट केल्याचे सांगितले. शहराचा विकास राष्ट्रवादीमुळे झाल्याचे जनतेच्या लक्षात आले. त्यामुळे राष्ट्रवादीची कामे घरघर पोहचवावीत. भविष्य आणि वेळ आपल्याकडेच राहणार आहे. कारण, घड्याळ हीच आपली खूण आहे. आपली राष्ट्रवादी आपली पालिका ही मशाल पेटून कामाला लागावे. विजय आपलाच आहे. पण, त्यासाठी कष्ट करा, संघर्ष करावा. संघर्षाशिवाय यश नाही, असे मार्गदर्शन पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.