Esha Gupta: ‘मला गरीबांची अँजेलिना जोली म्हणू नका हो’, असं ‘कोणती’ अभिनेत्री म्हणतेय बरं ?

'Don't call me Angelina Jolie of the poor,' says actress Esha Gupta

एमपीसी न्यूज – हॉलिवूडची सर्वात बहुचर्चित अभिनेत्री कोण ? असं म्हटल्यावर आपल्यासमोर अँजेलिना जोलीच येते. आजही ती तिचे फॅन फॉलोइंग सांभाळून आहे. पण बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीला भारताची ‘अँजेलिना जोली’ नव्हे ‘गरीबांची अँजेलिना जोली’ असं म्हटलं की खूप राग येतो.  अभिनेत्री ईशा गुप्ता आपल्या मादक फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून कायम चर्चेत असते. पण तिचे फोटो पाहून अनेकदा तिला ‘गरीबांची अँजेलिना जोली’ असं म्हटलं जातं. मात्र ईशाला हे फारसे आवडत नाही.

अलीकडेच तिने एका मुलाखतीत आपल्या फिल्मी करिअरवर गप्पा मारल्या. यावेळी तिची अँजेलिनासोबत तुलना करण्यात येते याविषयी तुला काय वाटते असे विचारले असता ती म्हणाली, ‘अँजेलिना आणि माझ्यात बरंच साम्य आहे. त्यामुळे अनेकदा माझी तुलना तिच्यासोबत केली जाते. ही तुलना सौंदर्यापुरती मर्यादित असेल तर ठीक आहे. परंतु अनेक जण दोघांच्या करिअरमध्येही तुलना करतात’.

‘अँजेलिना नक्कीच माझ्यापेक्षा जास्त यशस्वी आहे. परंतु त्यामुळे मला ‘गरीबांची अँजेलिना’ म्हणून पुकारणं योग्य नाही. सुरुवातीला ही तुलना ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात जायची. प्रचंड राग यायचा. मात्र आता मला त्याची सवय झाली आहे. आता मी माझ्या रागावर नियंत्रण करायला शिकली आहे.’

ईशा गुप्ता एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. 2012 साली ‘जन्नत 2’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर रुस्तम, राज 3, बेबी, हमशकल, कमांडो 2 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ईशा चित्रपटांमधील हॉट सीन्समुळे प्रचंड चर्चेत असते. अभिनयासोबत ती फॅशन मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रीय आहे.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.