Pimpri News : श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती निमित्त मंदिरात भजन, किर्तनाचे आयोजन करू नका

कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, मिरवणुका काढू नयेत; महापालिकेचा आदेश

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने श्रीरामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंती उत्सव साधेपणाने साजरे करावेत. मंदिरात भजन, किर्तन, पठन इत्यादी किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू नये. कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, मिरवणुका काढण्यात येवू नयेत, असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

श्रीरामनवमी उत्सव आज आहे. 25 एप्रिल रोजी महावीर जयंती तर 27 एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव आहे. दरवर्षी नागरिक एकत्र येऊन मोठ्या संख्येने हे उत्सव साजरे करतात. परंतु, यंदा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने श्रीरामनवमी उत्सव, महावीर जयंती आणि हनुमान जयंती उत्सव आपआपल्या घरी साजरा करणे अपेक्षित आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठन इत्यादी किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू नये.  मंदिरांमधील व्यवस्थापक, विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन प्रक्षेपन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून द्यावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.