Pune: कोरोना झाला तरी घाबरून जाऊ नका, हा आजार बरा होतो – महापौर मुरलीधर मोहोळ

Don't panic even if you get corona, the disease gets cured - Mayor Muralidhar Mohol.

एमपीसी न्यूज – मागील 20 दिवसांपासून मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी जो कोरोनाचा अनुभव घेतला. त्यावरून  एकच सांगतो. कोरोनाला काहीही घाबरण्याचे कारण नाही. कोरोना झाल्यावर बरा होतो, फक्त काळजी घ्या, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

कोरोना होणार नाही याची काळजी घ्या, जरी झाला तरी घाबरून जाऊ नका, 100 टक्के रुग्ण बरे होत आहेत. आपली यंत्रणा चांगले काम करीत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोरोनामुक्त होत आपल्या सर्वांच्या सदिच्छांच्या जोरावर सोमवार पासून पुन्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.

गेल्या आठवड्यापासून बदललेल्या परिस्थितीमुळे नक्कीच मोठी आव्हाने समोर आहेत. मात्र, आपण सर्व सामूहिकपणे या संकटाविरुद्ध लढूयात आणि जिंकूयात, असा निर्धार महापौरांनी केला.

मागील 20 दिवसांनंतर कोरोनाच्या आजरातून महापौर मुरलीधर मोहोळ आज बाहेर पडले.

पुणे शहरातील कोरोनाचे वाढते संकट या पार्श्वभूमीवर काही बैठकाही महापालिकेत त्यांनी घेतल्या. गेल्या काही दिवसांत बेड्सची उपलब्धता, आयसीयू बेडस, व्हेंटिलेटरची कमतरता, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

या सर्व कोरोनाच्या संकटावर आपल्याला सर्वांनी मिळून मात करायची आहे. मी बरा झालो, माझे कुटुंब या आजारातून सुखरूप बरे झाले आहेत. पण, माझे पुणे शहर यातून सुखरूप बरे झाले नाही. त्यामुळे लवकरात लवकर पुणे शहर आपल्याला बाहेर काढायचे आहे.

त्यासाठी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागणार आहे. व्हेंटिलेटर, आयसीयू बेडस याची कमतरता आता जाणवत आहे. ही यंत्रणा उभारणे, जास्तीत जास्त कोरोनाच्या टेस्टिंग करणे, लवकरात लवकर आपल्याला या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

गेले 8 दिवस जरी मी हॉस्पिटलमध्ये होतो तरी प्रशासन, आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. रोजचा आढावा घेत होतो, असेही महापौर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like