Maharashtra News : टक्केवारीच्या भानगडीत मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका, गोपीचंद पडळकर यांचा आदित्य ठाकरे यांना टोला

एमपीसी न्यूज : राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी एक ट्विट करून राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करणार असल्याचे सांगितले होते. परंतु काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलिट केले. त्यावरून आता भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्यांकडून वाटाघाटी आणि टक्केवारीच्या भानगडीमध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या लोकहिताचा मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नये इतकीच आमची मागणी.

पडळकर म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सर्वांसाठी मोफत लसीकरण करणार असल्याचे सांगितले होते. त्यांचे हे ट्विट पाहून आनंद झाला. उत्तर प्रदेश, आसाम आणि इतर काही राज्यांनी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मोफत लसीकरण करण्यात यावे अशी आम्ही मागणी केली होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे आनंद झाला परंतु काही वेळातच हे ट्विट डिलीट झाले. त्यामुळे टक्केवारी च्या नादात हा निर्णय मागे घेऊ नये अशी मागणीही त्यांनी यावेळी केली..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.