Bhosari Crime News : ‘तु या घरात पुन्हा पाऊल टाकू नकोस’; पतीसह सात जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – ‘तु या घरात पुन्हा पाऊल टाकू नकोस’ असे म्हणत विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत मानसिक छळ केला. 16 तोळे सोने आणि भावाचे 6 लाख 50 हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे. हा प्रकार मार्च 2017 ते 22 मे 2022 दरम्यान शिंदेवाडी आंबेगाव व इंद्रायणीनगर भोसरी येथे घडला.

याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पती अनिकेत प्रभाकर काळे (वय 38), 55 वर्षीय सासूस सासरे प्रभाकर बबनराव काळे (वय 60), दीर अमोल प्रभाकर काळे (वय 42), 38 वर्षीय जाऊ (सर्व रा. शिंदेवाडी, आंबेगाव), 40 वर्षीय नणंद आणि नणंदेचे पती नितीन शंकर शिंदे (वय 46 दोघे रा. ऐरोली, नवी मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेचे 2017 मध्ये लग्न झाले आहे. तेव्हापासून फिर्यादीचा छळ केला जात आहे. सासु, सासरे, दीर, जाऊ, नणंद, नणंदेचा पती यांनी फिर्यादीस तु या घरात पुन्हा पाऊल टाकू नकोस असे म्हटले. तसेच फिर्यादीची आई, भावाला नेहमी शिवीगाळ करत. फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक छळ केला. फिर्यादीचे 16 तोळे सोने, भावाचे 6 लाख 50 हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.