22.2 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 16, 2022

Rupali Thombare : बापाला धमकी देऊ नका, रूपाली ठोंबरे यांची राणेंवर जहरी टीका

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : बापाला धमकी देण्याचं काम नारायण राणे (Rupali Thombare) सारख्या बेडकांनी करू नये. असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केला आहे. काल नारायण राणे यांनी एक ट्विट करत थेट शरद पवार यानांच धमकी दिली होती.

आमदारांच्या केसाला जरी धक्का लागला तर तुम्हाला घर गाठणे कठीण होईल, अशा आशयाचं ट्विट राणे यांनी केलं होत. आता त्यांच्या याच विधानानंतर रुपाली ठोंबरे या आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत. नारायण राणे स्वतःला केंद्रीय यंत्रणापासून वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेले आहेत, हे साऱ्या जगाला माहित आहे अशी टीका देखील रुपाली ठोंबरे यांनी राणे यांच्यावर केली आहे.

MPC News Event : ऐतिहासिक चित्रपट आवडणाऱ्या रसिकांसाठी आज पर्वणी

रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) म्हणाल्या, नारायण राणे यांची भूमिका भाजपची भूमिका आहे का? नारायण राणे सारख्यांच्या धमकीला कोणी भीक घालत नाही. स्वतःला किडीपासून वाचण्यासाठी राणे भाजप मध्ये गेल्याचे जगाला माहिती आहे. त्यांना वाटत असेल की आपण फार मोठे गुंड आहोत. आम्हाला गुंड बनायला भाग पाडू नका. बापाला धमकी द्यायचं काम करू नका. राजकारणात बदनाम आहात, नात्यात होऊ नका. पावसाळा आहे बेडकं बाहेर येणारच, असा टोला देखील त्यांनी नारायण राणे यांना लगावला.

spot_img
Latest news
Related news