Chinchwad News : दिवाळी फराळची चिंता नको, ‘येथे’ मिळेल ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्वस्तात फराळ

एमपीसी न्यूज – दिवाळीचा मंगलमय सण तोंडावर आला आहे, घरोघरी दिवाळीसाठी चमचमीत फराळाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पण, धावपळीच्या जीवनात फराळ बनवण्यासाठी वेळ मिळत नाही तसेच, आपल्या अपेक्षेनुसार चविष्ट पदार्थ करता येत नाहीत.

त्यामुळे द पूना मर्चंट चेंबर यांच्या वतीने नागरिकांसाठी ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्वस्तात फराळ उपलब्ध करून दिला आहे. संभाजीनगर, चिंचवड येथे बुधवारपासून (दि.27) फराळ खरेदी करता येईल.

लाडू, चिवडा आणि इतर पदार्थ नागरिकांना येथे उपलब्ध होतील. प्रत्येकी 144 रुपये किलो या दराने फराळ खरेदी करता येईल. संभाजीनगर, चिंचवड येथील श्रीराम जनरल स्टोअर येथे हा फराळ उपलब्ध असून, उद्या म्हणजेच बुधवारपासून येथे फराळ खरेदी करता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क – 

9637450700

9518543869

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.