Vadgaon Maval : श्री पोटोबा महाराज देवस्थानाचे दरवाजे भाविकांसाठी खुले

एमपीसी न्यूज :  गेले आठ महिने बंद असलेले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज देवस्थानाचे दरवाजे उघडण्यात आले.  भाविकांना पोटोबा महाराजांचे दर्शन मिळाल्याने आनंदाचे वातावरण पसरले.  यावेळी श्री पोटोबा देवस्थान विश्वस्त मंडळाने मंदिरात आरती करून , पेढे वाटून केला आनंद उत्सव साजरा. 

साडे तीन मुहूर्ता पैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या दिवशी श्री पोटोबा महाराज मंदिराचे दरवाजे उघडल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून वडगाव मावळकरांची दिवाळी गोड झाली आहे. याबद्दल आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मानले आभार, यावेळी मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे, सहसचिव किरण भिलारे, विश्वस्त तुकाराम बुवा ढोरे,सुभाष जाधव,सुनिता कुडे, अरुण चव्हाण,आशा काटे,सुरेखा जाधव,  दत्तात्रय कुडे, शाम ढमाले,पुजारी सुरेश गुरव आदींसह भाविक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.