Pimpri : इन्कोव्हॅक लसीचे डोस मिळणार महापालिकेच्या आठ केंद्रांवर

ज्येष्ठांना प्रिकाॅशन डोसचे सुरक्षा कवच

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 8 लसीकरण केंदावर इन्कोव्हॅक लसीचा प्रिकाॅशन डोस दि, 8 में ते 15 मे या कालावधीत महापालिकेच्या 8 लसीकरण केंद्रांवर उपल्बध आहे.  वय 60 वर्षावरील वयोगटातील लाभार्थींना प्रिकाॅशन डोस देण्यात येणार आहे. (Pimpri) त्यामध्ये दररोज 20 लसीचे डोस देण्यात येणार आहेत. सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण डोस सकाळी 9.30 ते सायं 4.30 या कालावधीत देण्यात येणार आहे. 

तसेच दर रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपाालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी लाभार्थ्यांना इन्कोव्हॅक लसीकरणासाठी प्रधान्य देण्यात येईल.कोवीड 19 लसीचा पहीला कोविशिल्ड, दुसरा कोव्हॅव्सिन डोस दिला जाणार नाही.

Chinchwad:चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन

पिंपरी-चिंचवड महानगरपाालिकेच्या आठ लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसीच्या साठयानुसार वय 60 व पुढील वयोगटातील नागरिकांना इन्कोव्हॅक लसीचा प्रिकाॅशन डोस दिला जाणार आहे. (Pimpri) ज्या नागरिकांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅव्सिनचा दुसऱ्या डोसनतंर 6 महीने किंवी 26 आठवडयाचा कालावधी पुर्ण झालेला आहे. त्यांनी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन या पध्दतीने केल्यास ही लस नाकावाटे देण्यात येईल. या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या निकषानुसार लाभर्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.