Double Masking : डबल मास्क परिधान करताय का ? ही काळजी घ्या

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गामुळे हाहाकार माजला आहे. अशात वैद्यकीय तज्ज्ञांनी संभाव्य तिसरी लाट अटळ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असून, सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. तसेच, अधिक खरबदारीच्या दुष्टीकोनातून वैद्यकीय तज्ज्ञांनी डबल मास्क परिधान करण्याची सूचना केली आहे.

याबाबत सरकारकडून डबल मास्क परिधान करताना काय करावे आणि काय करु नये याबाबत नियमावली जाहीर केली आहे.

‘हे’ करा

– डबल मास्क परिधान करताना त्यापैकी एक सर्जिकल मास्क असावा तर, दुसरा दोन पदरी किंवा तीन पदरी मास्क असावा.

– नाकाच्या वरच्या बाजूला मास्क घट्ट बसवलेला असावा.

– श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

– स्वच्छ मास्क वापरा, वापरलेलं मास्क नियमित स्वच्छ धुवून घ्या.

‘हे’ करु नका

– एक प्रकारचेच दोन वापरु नका.

– तेच मास्क सलग दोन दिवस वापरु नका.

देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. दररोज चार लाखांच्या घरात नव्या रुग्णांची वाढ होत आहे तर, जवळपास चार हजार मृत्यू होत आहेत. लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अजूनही योग्य खबरदारी घेणं हाच कोरोनावर प्रभावी उपाय आहे. तसेच, लस उपलब्ध होईल तशी ती टोचून घ्यावी असे आवाहन केलं जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.