Bhosari : दाम दुप्पटचे अमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाला दोन लाखाला फसवले

मोशी येथील प्रकार, दहा वर्षानंतर फसवणूक झाल्याचे कळले

169

एमपीसी न्यूज – दहा वर्षात दाम दुप्पट पैसे मिळणार असल्याचे अमिष दाखवून वेगवेगळ्या पाच मोबाईल क्रमांकावरून संपर्क करून ज्येष्ठ नागरिकाची दोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार मोशी येथे उघडकीस आला.

HB_POST_INPOST_R_A

सुदाम बबन ढगे (वय 64, रा. इंद्रायणी पार्क, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पाच मोबाईल क्रमांकधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ढगे यांना मे 2008 मध्ये एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने पैशांच्या दाम दुप्पट योजनेविषयी ढगे यांना माहिती दिली. त्यांना वेळोवेळी फोन करून या योजनेकडे आकर्षित केले. वेगवेगळ्या पाच क्रमांकावरून फोन करून ढगे यांना बॅंक ऑफ बडोदाच्या खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. हा व्यवहार 2008 ते 2018 या दहा वर्षात झाला. ढगे यांनी रक्कम भरली. मात्र, दहा वर्षानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. एमआयडीसी भोसरी पोलीस याचा तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: