Double Mutant In India : देशातील 28 राज्यात कोरोना विषाणूचा ‘डबल म्युटेन्ट’

एमपीसी न्यूज – भारतात 28 राज्यात कोरोना विषाणूचा ‘डबल म्युटेन्ट’ आढळला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात वाढत असलेली रुग्णांची संख्या आणि या म्युटेन्टचा काही संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून, सक्रिय रुग्णांच्या संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनाचा आढळलेला ‘डबल म्युटेन्ट’ इतर देशात देखील आढळला आहे. भारतात नव्या प्रकारातील अधिक रुग्ण सापडले नाहीत असे मंत्रालयाने म्हटले आहे.

नव्यानं सापडलेला विषाणूचा हा प्रकार रोग प्रतिकारक शक्ती पासून बचाव करत संसर्ग पसरवतो. याचे सध्या थोडेच नमूने सापडले आहेत. मात्र, पूर्वीच्या नमून्यापेक्षा हा म्यूटेन्ट वेगळा असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. महाराष्ट्रातील नमून्यांची तपासणी केली असता डिसेंबर 2020 च्या तुलनेत E484Q व L482R या प्रकारात वाढ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.