शुक्रवार, डिसेंबर 2, 2022

Pune News : डॉक्टर पत्नीच्या चारित्र्यावर संशय, बनावट फेसबुक अकाउंट तयार करून बदनामी

पतीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : डॉक्टर असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून त्यांची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(Pune News) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका 28 वर्षीय डॉक्टर महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी 2021 पासून हा सर्व प्रकार सुरू होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पती-पत्नी आहेत. फिर्यादी या डॉक्टर असल्यामुळे त्या बाहेर एका रुग्णालयात काम करतात. दरम्यान पत्नीचे बाहेर अफेअर सुरू असल्याचा संशय आरोपी पतीला होता. यासाठी तो तिला काम सोडण्याची जबरदस्ती करत होता. काम नाही सोडली तर ठार मारण्याची धमकीही त्यांनी दिली होती. इतकेच नाही तर फिर्यादी महिलेच्या मैत्रिणी जवळही त्याने फिर्यादी यांची बदनामी केली होती.

Pune crime : पत्नीचा नांदण्यास नकार, नातजावयाने केला सासूला ठार मारण्याचा प्रयत्न

दरम्यान काही दिवसांपूर्वी आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या आईचे फेसबुक वर बनवट खाते तयार केले. त्यावर फिर्यादी यांचे विषयी चुकीचा मजकूर टाकून त्यांची बदनामी केली.(Pune News) भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

Latest news
Related news