Akurdi : डॉजबॉलमध्ये म्हाळसाकांत कॉलेजने पटकावला दुहेरी मुकुट

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शालेय जिल्हा डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डीच्या मुले व मुली या दोन्हीनी संघाने राजमाता जिजाऊ कॉलेज विरुद्ध खेळताना सलग दोन सेट जिंकून उत्कृष्ट खेळ करीत विजय मिळवला. 
पुणे जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी व पिंपरी चिंचवड महापालिका द्वारा शालेय जिल्हास्तर (पिंपरी-चिंचवड) जिल्हा डॉजबॉल क्रीडा  स्पर्धेचे आयोजन महापालिकेच्या संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर भोसरी येथे करण्यात आले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसकांत विद्यालय, आकुर्डीचे (मुले/मुली) सहभाग क्रीडा स्पर्धेत घेतला होता. मुले संघाने राजमाता जिजाऊ कॉलेज विरुद्ध खेळताना सलग दोन सेट जिंकून विजय संपादन केला. या संघात व मुली दोन्ही संघाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.

पुणे येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी मुले व मुली दोन्ही संघाची निवड झाली. मुलांच्या संघात अनिकेत तपासे, आदित्य निकम, श्रेयश थोरात,केशव माळवे यांनी उत्कृष्ट खेळ खेळला.  तसेच मुलीच्या संघाने राजमाता जिजाऊ कॉलेज संघा विरुद्ध खेळताना सलग दोन सेट जिंकून एकतर्फी विजय संपादन केला. मुलीच्या संघात हर्षदा भोसले, वैष्णवी कुलकर्णी, सत्यम सिंग यांनी उत्कृष्ठ खेळ केली. खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा अनिल दाहोत्रे यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी दोन्ही संघाची झाल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, मानद सचिव व सिनेट मेंबर  अँड संदीप कदम, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार अँड मोहनराव देशमुख, उपसचिव एल एम पवार, सहसचिव(प्रशासन) आत्माराम जाधव, सहा. सहसचिव डॉ एम.जी चासकर, क्रीडाप्रमुख शाम भोसले, प्राचार्य अन्सार शेख, उपप्राचार्य बाबासाहेब शितोळे यांनी खेळाडूचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.