विद्यापीठाच्या तदर्थ अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ अजयकुमार राय

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत बीएससी हॉस्पिटॅलिटी स्टडीज (Hospitality Studies) या तदर्थ अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ अजयकुमार राय यांची (Ad-hoc Board) नियुक्ती करण्यात आली.

डॉ.राय हे गेली अनेक चिंचवड येथील डॉ अरविंद तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ़ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत येणाऱ्या तदर्थ अभ्यासमंडळावर (Ad-hoc Board) ‘अध्यक्ष’ म्हणून सदर पत्र निर्गमित झालेल्या तारखेपासून दोन वर्षांकरिता नियुक्ती केलेली आहे.विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या आदेशानुसार उपकुलसचिव डॉ मुंजाजी रासवे यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.

Nigdi News: सातव्या भक्ती-शक्ती सायक्लोथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

कॉलेजमध्ये फूड फेस्टिव्हलसह अनेक उपक्रम राबविण्यात राय हे अग्रेसर असतात. या नियुक्तीबद्दल संस्था कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राय यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम २६ (१८) व सध्या अस्तित्वात असलेल्या परिनियम ७ मधील तरतुदीनुसार तदर्थ अभ्यासमंडळाची नियुक्ती केली जाते. विद्यापीठाच्या नियमानुसार डॉ राय हे लवकरच सहा सदस्यांची समिती गठीत करतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.