Dehu road : महापरिनिर्वाण दिनानिमित्त देहूरोड शहर ब्लॉक कॉग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन 

एमपीसी न्यूज : आज मंगळवार 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देहूरोड शहर ब्लॉक कॉग्रेस कमिटीच्या (Dehu road) वतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे आंबेडकर पावन स्मृतीस कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक हाजीमलंग काशीनाथ मारिमुत्तु व महाराष्ट्र प्रदेश सदस्य दीपक सायसर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Pimpri News : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

त्याचप्रमाणे धम्मभूमी बुद्ध-विहार येथे भगवान गौतम बुद्ध मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच स्तूप येथे हि अभिवादन करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवडचे अबुबकर लांडगे, मावळ तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष गफूरभाई शेख, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, (Dehu road) उपाध्यक्ष शंकर टी जयसिंग, महिला अध्यक्षा सौं वैशालीताई जगताप, किसान सेल अध्यक्ष संभाजी पिंजण, सेवा दल अध्यक्ष सुखदेव निकाळजे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष मेहबूब गोलंदाज, युवा नेते मलिक शेख, सह-सचिव बबन टोंम्पे, रईस शेख तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.