Bhosari: खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या’जगदंब प्रतिष्ठान’तर्फे 150 ओला, उबर चालकांना धान्य किटचे वाटप

एमपीसी न्यूज – गेले महिनाभर लॉकडाऊनमळे व्यवसाय बंद पडलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील 150 ओला आणि उबर चालकांना खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या’जगदंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून आज (सोमवारी) धान्य किट्सचे वाटप करण्यात आले.

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील ओला व उबर चालकांच्या उत्पन्नाचा मार्गही बंद पडला. त्यामुळे आपल्या कुटुंबाचे पोषण कसे करायचे या विचाराने कासावीस झालेल्या 150 ओला व उबर चालकांच्या कुटुंबांसाठी धान्य किट्स पुरविण्याच्या सूचना डॉ. कोल्हे यांनी आपल्या ‘जगदंब प्रतिष्ठान’चे समन्वयक व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल हरपळे यांना दिले.

डॉ. कोल्हे यांचा आदेश मिळताच आज ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या वतीने 150 धान्य किटसचे ओला व उबर चालकांच्या कुटुंबांना वाटप करण्यात आले. ‘कोरोनाची साखळी तोडू, माणुसकीची साखळी जोडू’ या डॉ. कोल्हे यांच्या संकल्पनेतून गेले महिनाभर ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून मतदारसंघातील गरीब व गरजू नागरिकांना धान्य किट्स वाटण्यात आली असून संपूर्ण शिरूर मतदारसंघात आतापर्यंत साडेपाच हजाराहून अधिक धान्य किट्सचे वाटप करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.