BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : संभाजी मालिकेनंतर मालिका विश्वातून निवृत्ती : डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन 

चाकणमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा

INA_BLW_TITLE
सध्या माझ्यावर होत असलेल्या वैयक्तिक टीकेला मी त्या पद्धतीने उत्तर देणार नाही, मात्र माझ्या मालिकेवरून मला टीकेचे लक्ष करणाऱ्यांना एक गोष्ट सांगतो कि, संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास मालिकेतून मांडल्यानंतर मी मालिका विश्वातून बाहेर पडणार असून पूर्ण वेळ समाजसेवेला वाहून घेणार आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेतेराष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार  डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी (दि.२३) चाकण ( ता. खेड) येथे केले. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते, अॅड. राम कांडगे, मंगलदास बांदल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जयप्रकाश परदेशी, कैलास सांडभोर, राहुल नायकवाडी, जीवन सोनवणे, दतात्रेय बिरदवडे, अनिल ( बाबा ) राक्षे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.दरम्यान सभेच्या आधी चाकण शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी युवकांचा सहभाग मोठा होता.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.