Pimpri News: 4 तास झाले तरीही विषयपत्रिकेला अद्याप सुरूवात नाही, काही लपवायचं तर नाही ना? – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कारभाराविषयी गेल्या साडेचार वर्षात अनेक गोष्टी ऐकिवात होत्या. आज मी स्वतः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला प्रेक्षक गॅलरीत उपस्थित आहे. परंतु, 4 तास झाले तरीही विषयपत्रिकेला अद्याप सुरूवात नाही… नक्की काय गडबड आहे? काही लपवायचं तर नाही ना? हीच का सत्ताधारी पक्षाची पारदर्शकता? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट देखील केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पाच महिन्यांनी पिंपरी- चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा आज (बुधवारी)
ऑफलाइन सुरू आहे. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. सभेला दुपारी दोन वाजता सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीपासून खासदार डॉ. अमोल कोल्हे सभेला हजर आहेत. पण, अद्याप पर्यंत विषयपत्रिकेवरील विषयाला सुरुवात झाली नाही.

शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अचानक हजेरी लावली. नागरिकांच्या कक्षात बसून सभागृहात पक्षाचे नगरसेवक विरोधात बोलतात की नाही यावर ‘वॉच’ ठेवला.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कारभाराविषयी गेल्या साडेचार वर्षात अनेक गोष्टी ऐकिवात होत्या. आज मी स्वतः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला प्रेक्षक गॅलरीत उपस्थित आहे. परंतु,4 तास झाले तरीही विषयपत्रिकेला अद्याप सुरूवात नाही… नक्की काय गडबड आहे? काही लपवायचं तर नाही ना? हीच का सत्ताधारी पक्षाची पारदर्शकता? असा सवाल करणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.