​Pune : वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. अरुण दीक्षित

एमपीसी न्यूज – मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र  व  महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर पाबळच्या विज्ञान आश्रमातील संशोधक डॉ. अरुण दीक्षित येणार आहेत. नत्रचक्र कसे व कोण चालवते?  हा त्यांच्या गप्पांचा विषय असणार आहे. येत्या मंगळवारी, (दि.२८ ऑगस्ट २०१८) सायंकाळी ५:३० वाजता सेनापती बापट रस्त्यावरील मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राच्या सभागृहात हा वैज्ञानिक कट्टा भरणार आहे. 

नत्रांचा सजीव – निर्जीव- सजीव प्रवास कसा घडतो ? उत्तम खात निर्मितीसाठी नत्राची काय गरज आहे ? युरियाचा वापर कितपत करणे योग्य आहे? नत्र कमी व अधिक झाल्याने खत बनविण्याची प्रक्रिया कशी बदलते? शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर थांबवावा का? अशा विविध महत्वपूर्ण प्रश्नांवर डॉ. दीक्षित बोलणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, अधिकाधिक विज्ञानप्रेमींनी या कट्ट्यावर सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र. यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.