BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : डॉ. पतंगराव कदम फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड लोकश्री डॉ. पतंगराव कदम फाऊंडेशनच्या वतीने सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू, गहु, तांदूळ, बिस्किट पुडे, वैद्यकिय औषधे, मसाले, पोहे, पाण्याच्या बाटल्या, कपडे इत्यादी वस्तूंचे संकलन फाऊंडेशनचेच्यावतीने मदत देण्यात आली.

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण मोहिते, उपाध्यक्ष गुणवंत कामगार ईस्माईल मुल्ला, टाटा मोटर्सचे कर्मचारी श्रीकांत कदम, किरण कांबळे, संभाजी महिंद, अशोक भोर, पंढरीनाथ माने, आदींनी रोख अकरा हजार व जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करण्यात आले. सदर सर्व मदत सांगली व कोल्हापूर येथे जावून पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे, असे श्रीकांत कदम समवेत आदींनी सांगितले.

तेथील परिस्थिती पाहता शहरातील नागरिकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी क्षमतेनूसार मदत करावी, असे आवाहन देखील फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्ष नारायण मोहिते यांनी केली. या संकलन मोहिमेत टाटा मोटर्सच्या कर्मचार्‍यांनी व आदींनी विशेष पुढाकार घेतला.

 

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3