Pune : संविधानाच्या प्रती मोफत वाटण्याचा संकल्प

एमपीसी न्युज : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने एक लाख संविधानाच्या मोफत प्रती वाटण्याचा महासंकल्प करण्यात आला आहे. तसेच हा संकल्प राज्यातील सर्व शाळांमध्ये करण्यात आला आहे.(Pune) समितीचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कांबळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येणार असून, 14 एप्रिल 2023 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधानाच्या (एक लाख प्रती) मोफत वाटण्यात येणार आहेत.

या महासंकल्पाचा शुभारंभ पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला झाला. प्रातिनिधिक स्वरूपात पुण्यातील न्यू इंग्लिश स्कुल, चाटे पब्लिक स्कुल, महात्मा गांधी विद्यालय, अभिनव विद्यालय, सनब्राईट स्कुल इत्यादी शाळांना पाटील यांच्या हस्ते संविधान सुपूर्द करण्यात आले. प्रसंगी आंबेडकर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे, सागर पानसरे, हर्षद दौंडकर, ऍड. मंदार जोशी, ऍड. अपूर्वा लिमये, भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, ध्रुव जगताप, बामणे सर, मुक्ता बर्वे, भालेकर सर, संदीप बेलदरे, संघदीप शेलार,आदी उपस्थित होते.

Pimpri : उन्हाळ्यात कैरीच्या पन्हयासाठी नागरिकांची पसंती

कार्यक्रमाच्या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने घेतलेला हा उपक्रम महत्वपूर्ण आहेत.(Pune) प्रत्येक अडचणींवर उपाय असलेल्या संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगायला हवे. यासाठी शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व्हायला हवे  ऍड. मंदार जोशी यांच्यासह शाळांच्या प्रतिनिधींनी या महासंकल्पाविषयी भावना व्यक्त केल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.