Pimpri News : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – भारतीय घटनेचे शिल्पकार, (Pimpri News) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना महापालिका, विविध राजकीय पक्षांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.पिंपरी चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, विठ्ठल जोशी, रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक,  कर्मचारी महासंघाचे महादेव बोत्रे, मनोज माछरे, उमेश बांदल, बालाजी ऐयंगार,शेखर गावडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनी परिसरातील तसेच दापोडी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  एच.ए. कॉलनी येथील कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, माजी नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा धर सामाजिक कार्यकर्ते संजय केंगले, रमेश जाधव, (Pimpri News) मिलिंद जाधव, रवि कांबळे, सुरेंद्र पासलकर, मारोती बोरावले,सुनील थोरात, सुनिता शिवतारे, सुरेश केंगले यांच्यासह  कंपनी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. तर, दापोडी येथील कार्यक्रमास पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उप निरीक्षक  बालाजी झोनापल्ली, माजी नगरसदस्य राजू बनसोडे, रोहित अप्पा काटे, संजय काटे, माजी नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.

Akurdi News : फायर मॉक ड्रिल च्या प्रशिक्षणामुळे बिना इंग्लिश मीडियम शाळेच्या 500 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढणे झाले शक्य

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, दक्षिण भारत आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सुजाता पलांडे, शैला मोळक, मनोज तोरडमल, सुभाष सरोदे, कोमल शिंदे, धनराज बीरदा, दीपक नागरगोजे, सतीश नागरगोजे, मंगेश धाडगे, सचिन उदागे, गिरीष देशमुख, कैलास सानप, प्रमोद ताम्हणकर, संतोष मोरे, गणेश ढाकणे, हेमंत देवकुळे, समीर जावळकर, प्रशांत बाराथे, संजय परळीकर आदी उपस्थित होते.

माजी खासदार साबळे म्हणाले की, हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव करून दिली. (Pimpri News) कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी बाबासाहेबांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळेच आज दलित समाज सुशिक्षित झाला. भारतीय संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेबांमुळेच आपल्याला शिका…संघटित व्हा आणि संघर्ष करा.. हा मूलमंत्र मिळाला.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या आवारात उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास वंदन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते पिंपरी चौक येथील पुतळ्यास पुष्पहार तसेच पक्ष कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पक्षप्रवक्ते विनायक रणसुभे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, खजिनदार दिपक साकोरे, पदवीधर अध्यक्ष माधव पाटील, महिला कार्याध्यक्षा कविता खराडे, सरचिटणीस किरण नवले, शिवाजी गव्हाणे, योगेश गायकवाड, सत्तार शेख, महिला उपाध्यक्ष अर्चना जाधव,  सोशल मिडिया  चिंचवड  विधानसभा महिला अध्यक्ष संजीवणी पुरानिक, विशाल जाधव, विलास वाघमारे, शहर युवक सरचिटणीस दिपक गुप्ता, शत्रुग्न पवार, सरचिटणीस अर्जुन कदम, सुनिल अडागळे, धनाजी तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड तर्फे पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. (Pimpri News) यावेळी आम आदमी पार्टीचे शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, प्रचार प्रमुख राज चाकणे, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष यशवंत कांबळे, भोसरी विधानसभा प्रचार प्रमुख स्वप्निल जेवळे,  चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख संजय मोरे, सुरेंद्र कांबळे, ओमीन गायकवाड, अजय सिंग आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.