Mumbai: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’वर अज्ञातांकडून दगडफेक, तोडफोड

Mumbai: Dr. Babasaheb Ambedkar's residence 'Rajgruha' vandalized by unknown persons गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी वेगाने तपास करून आरोपींना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

एमपीसी न्यूज- घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृह’वर मंगळवारी (दि.7) सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी वेगाने तपास करून आरोपींना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.


मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केला. यात त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, दादर येथील ‘राजगृह’ या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.