Talegaon : डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस आंबी तळेगाव येथे पदवीग्रहण सोहळा 

0

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत अभियांत्रिकीच्या २०१८-१९ च्या पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण सोहळा दि ८ फेब्रुवारी २०२० रोजी  संपन्न झाला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुजित परदेशी (चेअरमन, बोर्ड ऑफ स्टडीज, मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) हे उपस्थित होते.

तसेच डी. वाय. पाटील कॅम्पस मधील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. अभय पवार, डॉ. लक्ष्मण कांबळे आणि डॉ. राजेश खेर्डे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी भवानराव गायकवाड, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अशोक पाटील आणि सहाय्यक रजिस्ट्रार राजेंद्र पाटील हे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या परीक्षा अधिकारी डॉ. रेणू पराशर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like