Akurdi : डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात  वाचन प्रेरणा दिन साजरा  

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले. त्या निमित्ताने ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. मोहन वामन यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर अवांतर वाचन करण्याचे आवाहन करताना असे म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर त्या क्षेत्रातील नवी माहिती, नवे ज्ञान, अद्यावत कौशल्ये आत्मसात करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे.

प्रा. विशाल गायकवाड यांनी बुक टौक या विषयावर कार्यशाळा घेतली. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामुळे पुस्तकवाचन संस्कृती मागे पडत आहे, ती जपणे आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किमान एक तास अवांतर वाचन करून ज्ञान आत्मसात करावे असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी ‘रीड एंड सक्सीड’ असा गुरुमंत्र दिला. यावेळी कु. रचना टिळेकर व कु. कल्याणी धसाडे या विद्यार्थिनींनी डॉ. कलाम यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडला.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. संध्या पाटील, प्रा. मुकेश तिवारी, प्रा. मीनाक्षी गोणारकर, प्रा. भागवत ढेसले, श्री. जयसिंग पाटील व श्री. विठ्ठल पोहरे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. मोहन वामन व संस्थेच्या विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संध्या पाटील व आभार प्रा. गणेश फुंदे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षकेत्तर व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.