Pimpri : डॉ. डी.वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय देशात अव्वल

एमपीसी न्यूज – डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च महाविद्यालयास नवी दिल्ली येथे पार पाडलेल्या सी.आय.आय. – एज्युकेशन समिट : 2019 मध्ये बेस्ट इंडस्ट्री लिंक्ड फार्मास्युटिकल इन्स्टिट्यूट हा सन्मान प्राप्त झाला आहे. पारितोषिकाचे वितरण एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, डी.एस.टी. सचिव डॉ. आशुतोष शर्मा, सी.एस.आयआयचे  सह – अध्यक्ष बी.व्ही. आर. मोहन रेड्डी यांच्या हस्ते झाले आहे.

महाविद्यालयाचे प्रशासन, नेतृत्व, व्यवस्थापन, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, अध्यापन, अध्ययन प्रक्रिया आणि अभ्यासक्रम, स्किल डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट या विभागास अनुसरुन इंडस्ट्रि इंन्स्टिट्यूट पार्टनरशीप या विषयावर मूल्यमापन करण्यात आले. महाविद्यालयाच्या उत्तुंग यशाबद्दल डॉ. डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील, उपाध्यक्षा  भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मितादेवी जाधव यांनी प्राचार्य डॉ.
सोहन चितलांगे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

महाविद्यालय विद्यार्थ्यांचे संशोधनातील कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी सातत्याने फार्मा – इंडस्ट्रिशी चर्चासत्र, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध औषधी कंपन्यांना भेटी आयोजित करुन विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. महाविद्यालयाने ग्लॅक्सो, कॉग्निझंट, फ्युएल, बीव्हीजी लाईफ सायन्सेस, डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनाईजेशन भारत सरकार, ग्रीफीथ विद्यापीठ आयर्लंड आदी संस्थांबरोबर करार केला आहे. या मानांकनामुळे महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावर मान्यता तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संस्था व इंडस्ट्री यांच्यासमवेत भागीदारी करण्यासाठी जास्तीत जास्त संधी उपलब्ध असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.