Akurdi : डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूटमध्ये वाहन गतिशीलता विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टियूट ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च आकुर्डी येथे वाहन गतिशीलता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

आकुर्डी येथे झालेल्या कार्यशाळेत एसएई इंडियाचे संचालक संजय निबंधे, सचिव नरहरी वाघ, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. किरण नारकर आणि डॉ. सुनील डंबारे यांच्या हस्ते करण्यात आले.  प्रमुख वक्ते एनबी टेक्नॉलॉजीजचे डॉ. रवींद्र कोल्हे उपस्थित होते.

एसएई इंडियाचे संचालक संजय निबंधे म्हणाले की, अभियंत्यांनी वाहन बनविताना वाहन एरगोनॉमिक्स याचाही विचार करावा. कार्यशाळेमध्ये विविध कंपनीतील अभियंते आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील 58 विद्यार्थी सहभागी होते. एसएई इंडियाचे व्यवस्थापक सुधीर वैद्य व संचालक रमेश पसारीजा यांनी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा पुढील येणा-या काळातील विद्युत वाहनांसाठी महत्वाची ठरेल. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सतेज पाटील, संस्थेचे संलाचक कर्नल एस.के. जोशी, उपकुलसचिव  वाय. के. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.