Pune : जन्मजात बहिरेपणा : समस्या आणि उपाय’वर डॉ. दीपाली जोशी यांच्याशी विज्ञानगप्पा

एमपीसी न्यूज – मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विज्ञानगप्पां’च्या मालिकेत मुंबईतील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. दीपाली जोशी संवाद साधणार आहेत. ‘जन्मजात बहिरेपणा : समस्या आणि उपाय’ या विषयावर त्या गप्पा मारणार आहेत. येत्या शुक्रवारी ( दि. ९) सायंकाळी सहा वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीतील दृकश्राव्य सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, तो सर्वांसाठी विनामूल्य आहे. 

आपल्याला ऐकू कसे येते? त्यासाठी आपल्या शरीरात कोणती यंत्रणा कार्यरत असते? काहीजणांच्या बाबतीत जन्मजात बहिरेपणा का असतो? त्या व्यक्तींना कोणत्या अडचणी येतात? त्या अडचणींवर मात कशी करता येते? या आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अन्य बाबींसंबंधी डॉ. जोशी उहापोह करणार आहेत. अधिकाधिक विज्ञानप्रेमींनी या विज्ञानगप्पांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यवाह नीता शाह यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.