Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालया समोरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर मुरलीधर मोहोळ व उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी नगरसेवक प्रदीप गायकवाड, नगरसेविका लता राजगुरू, मंगला मंत्री, चांद बी हाजी नदाफ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, सहमहापालिका आयुक्त विजय दहिभाते, माहिती व जनसंपर्क अधिकारी संजय मोरे, क्षेत्रीय अधिकारी दयानंद सोनकांबळे, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. तसेच मनपा भवन येथील छायाचित्रास मुरलीधर मोहोळ व सरस्वती शेंडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नगरसचिव सुनील पारखी व नगरसचिव कार्यातील कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.