Pune : डॉ. कलाम यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन 

साहित्यवेध प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुपतर्फे १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी आयोजन

एमपीसी न्यूज –  साहित्यवेध प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्ताने व वाचक प्रेरणा दिनानिमित्ताने ‘कलाम पर्व’ या फोटोबायोग्राफी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४, १५ व १६ ऑक्टोबर २०१८ रोजी बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन पुणेकर विज्ञानप्रेमींना पाहण्यासाठी खुले असणार आहे. 

या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार दिनांक, दि. १५ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ५.०० वाजता बालगंधर्व कलादालनात डीआरडीओचे डायरेक्टर जनरल प्रवीण कुमार मेहता यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीआरडीओचे निवृत्त डायरेक्टर जनरल डॉ. सुभाषचंद्र सती असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी असणार आहेत. तसेच कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विज्ञानभारतीचे सहकार्यवाह मुकुंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरुण, विद्यार्थी यांच्यासह इतरांना विज्ञानविषयक ज्ञान व्हावे, डॉ. कलाम यांच्या विचारातून सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे, या हेतूने डॉ. कलाम यांच्या बालपणासून ते अखेरच्या क्षणापर्यंतची छायाचित्रे, त्यांचे विचार वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर डीआरडीओ, एआरडीई, पाषाण व आर. अँड डीई, दिघी येथील क्षेपणास्त्रांच्या प्रतिकृती व दुर्मिळ फोटो असणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, तरी सर्व विज्ञान प्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्यवेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे यांनी पुणेकरांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.