BNR-HDR-TOP-Mobile

Pune : डॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन समाजातर्फे दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शाकाहाराचे पुरस्कर्ते सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांना अहिंसा, प्राणिदया आणि शाकाहार प्रसारात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

वाकडेवाडी येथील राजयोग सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी डॉ. गंगवाल यांच्यासमवेत पत्नी डॉ. चंद्रकला गंगवाल, मुलगा डॉ. पारितोष, डॉ. आनंद, स्नुषा डॉ. सीमा, डॉ. लिशा, नातवंडे तेजस्विनी, सिद्धार्थ व विहान यांचाही सत्कार करण्यात आला. पाचशे पेक्षा अधिक जैन बांधव यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. गंगवाल यांनी १.५० लाखाची औषधें कोल्हापूर-सांगली भागातील पूरग्रस्तांना पाठवली, तर श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन समाजाच्या वतीने एक लाखाचा मदतनिधी देण्यात आला. यावेळी देवेन्द्र बाकलीवाल, नंदकुमार ठोले, महेन्द्र पाटनी, कैलाश ठोले, प्रकाश बड़जात्या, सुनील कटारिया, विनय चुडीवाल, मनीष बड़जात्या, कमल लोहाडे, मनीष कासलीवाल, पंकज पाटनी, भूपाली पहाड़े, अनीता गंगवाल, क्षमा अजमेरा, महेन्द्र गंगवाल, संदेश गंगवाल आदी उपस्थित होते.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पण ज्या जैन समाजाचा मी घटक आहे, त्याच समाजाकडून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे कौटुंबिक सन्मान आहे. अहिंसा, जीवदया आणि शाकाहार यासाठी हा जैन समाज आग्रही असतो. आणि माझ्याकडून प्रेरणा घेऊन माझे अनेक सहकारी अहिंसेच्या क्षेत्रात काम करत आहेत. आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.”

HB_POST_END_FTR-A2

.