Pune : नेत्रविकार शस्त्रक्रियेच्या व्हिडिओसाठी डॉ. केळकर यांचा ‘ऱ्हेट बकलर’ पुरस्काराने गौरव

Dr. Kelkar honored with 'Rhet Buckler' award for the video of the ophthalmic surgery.

एमपीसी न्यूज – डोळ्यांच्या पडद्याला झालेली इजा आणि मोतिबिंदू या आजारातून रुग्णाला येणारा अंधत्व रोखता येऊ शकते, याचा वस्तूपाठ पुण्यातील राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेतील (एनआयओ) नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांनी घालून दिला. त्यासाठी त्यांनी तयार केलेल्या शस्त्रक्रियेच्या व्हिडिओला ‘अमेरिकन सोसायटी ऑफ रॅटिना स्पेशालिस्ट’ तर्फे दिला जाणारा ‘ऱ्हेट बकलर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

मार्फन सिंड्रोम नावाचा नेत्रविकार असलेल्या रुग्णांचा नेत्रपटल जागेवरून निसटला. त्याच वेळी मोतीबिंदूही जागेवरून निखळला असल्याचे निदान झाले. या दोन्हीच्या शस्त्रक्रिया एकाच वेळी करण्यात आल्या.

दोन सख्या भावांना हा अशा प्रकारचा एकच नेत्रविकार एका वेळी झाला होता.

या दोन्ही रुग्णांमध्ये मोतिबिंदू निखळला होता. तसेच त्यांचे नेत्रपटलही जागेवरून निसटले होते. या कारणामुळे त्यांची दृष्टी गेलेली.

या दोन्ही रुग्णांवर अवघड अशी शाश्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आली.

या शस्त्रक्रियेचा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. नेत्रतज्ज्ञांना अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून हा व्हिडिओ उपयुक्त ठरला आहे.

त्याचे मार्गदर्शन या व्हिडिओमधून करण्यात आले आहे. शस्त्रक्रियेचे कौशल्य, नाविन्यता आणि सर्जनशीलता ही या व्हिडिओची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे डॉ. केळकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

देशातील मोजक्या नेत्रतज्ज्ञांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.

नेत्रतज्ज्ञ डॉ. अंचल अगरवाल, डॉ. प्रियांका पात्रा, डॉ. अक्षय कोठारी यांचा हा व्हिडिओ तयार व शस्त्रक्रियेत करण्यात सहभाग होता.

अमेरिकेतील सियाटल येथे “ऑनलाईन’ पार पडलेल्या फिल्म फेस्टिवलमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेत्रतज्ज्ञासाठी हा पुरस्कार ऑस्कर समान आहे.

नेत्ररोगाच्या संबंधीत चित्रफितींच्या गुणवत्तेच्या आधारे ही निवड करण्यात आली. चित्रफितीची मौलिकता, शैक्षणिक उपयुक्तता, दृकशाव्य गुणवत्ता, पटकथा लेखन आणि प्रभावीपणा या आधारावर पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. दरवर्षी जगभरातील 10 चित्रफितींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.